भारताची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे

भारताची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे

 

 स्पष्टीकरण लिहा

प्रश्न

भारताची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे

उत्तर

 

i) भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खासगी मालकीची असतात. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच शासनाच्या मालकीची असतात. मिश्र अर्थव्यवस्था खासगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रांत कार्य करते. 

ii) जी अर्थव्यवस्था केवळ साम्यवादी स्वरूपाची किंवा केवळ खासगी भांडवलशाही स्वरूपाची नसून, जिच्यात त्या दोन्ही प्रकारांचे मिश्रण आढळते, अशी अर्थव्यवस्था. 

iii) प्रचलित भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन मिश्र अर्थव्यवस्था असे करतात, कारण सरकारी क्षेत्र व खाजगी क्षेत्र अशी दोन्ही क्षेत्रे एकाच वेळी या अर्थव्यवस्थेत आज अस्तित्वात आहेत. 

iv) अशाप्रकारे आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा 'मिश्र अर्थव्यवस्थे'ला भारताने प्राधान्य दिले. म्हणून भारताची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे.



Previous Post Next Post