प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण दर्शवण्यासाठी कोणती पद्धती उपयुक्त असते, ते सकारण स्पष्ट करा

प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण दर्शवण्यासाठी कोणती पद्धती उपयुक्त असते, ते सकारण स्पष्ट करा

प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण दर्शवण्यासाठी कोणती पद्धती उपयुक्त असते, ते सकारण स्पष्ट करा. 

उत्तर :

प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण दर्शवण्यासाठी टिंब पद्धत उपयुक्त असते.

कारण - 

i) टिंब पद्धत ही अत्यंत सोपी पद्धत आहे. 

ii) या पद्धतीद्वारे भौगोलिक घटकांचे वितरण स्पष्टपणे दाखविता येते. तसेच भौगोलिक वितरणही सहज समजते. कारण एखादया भौगोलिक घटकाच्या दाट वितरणाचे व विरळ वितरणाचे प्रदेश सहज लक्षात येतात. 

iii) एका टिबांची ठराविक किंमत असल्यामुळे एखाद्या प्रदेशातील टिंबाची संख्या मोजून घटकाचे संख्यात्मक मूल्य काढता येते. 

iv) सामान्य माणसाला हा नकाशा सहज समजतो.

Previous Post Next Post