शहरांची वाढ विशिष्ट पद्धतीने झालेली आढळते

शहरांची वाढ विशिष्ट पद्धतीने झालेली आढळते

 

 स्पष्ट करा

प्रश्न

शहरांची वाढ विशिष्ट पद्धतीने झालेली आढळते.

उत्तर

 

i) शहरीकरण म्हणजे शहराच्या लोकसंख्येची व त्याच्या क्षेत्राचीवाढ होय. औद्योगिकीकरण व खेड्यातून शहराकडे होणारे लोकांचे स्थलांतर यांचा शहरीकरणात समावेश होतो. त्यामुळे शहरांची वाढ विशिष्ट पद्धतीने झालेली आढळते. 

ii) एखादया प्रदेशामध्ये उद्योगांचा विकास व केंद्रीकरण होणे हा नागरीकरणाला साहाय्यभूत ठरणारा घटक आहे. उद्योगधंद्यांच्या वाढीमुळे नोकरीच्या आशेने आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या प्रदेशाकडे आकर्षित होतात, त्यामुळे तेथे नागरीकरण वाढत गेले. 

iii) शहरे व्यापाराच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे तेथे नागरीकरण वाढत गेले. 

iv) उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे शहरांकडे लोकांचे स्थलांतरण होऊन विशिष्ट पद्धतीने शहरांची वाढ होते.


Previous Post Next Post