महत्त्व सांगा / फायदे लिहा शहरातील सामाजिक ऐक्य

महत्त्व सांगा / फायदे लिहा शहरातील सामाजिक ऐक्य

 

 महत्त्व सांगा / फायदे लिहा

प्रश्न

शहरातील सामाजिक ऐक्य

उत्तर

 

i) शहरात अनेक लोक रोजगारासाठी स्थलांतर करून येतात. हे लोक वेगवेगळ्या जाती, धर्माचे, पंथाचे असतात. हे सर्व लोक एकत्र राहतात. त्यांच्यात सर्वधर्म समभाव ही भावना निर्माण होते. 

ii) वेगवेगळ्या प्रदेशांतून आलेल्या लोकांच्या एकत्रित राहण्यामुळे शहरांमध्ये सांस्कृतिक व सामाजिक रूढी-परंपरांची देवाणघेवाण होत असते. यातून सामाजिक ऐक्य निर्माण होते. 

iii) शहरातील सण-उत्सवात सर्व धर्माचे, पंथांचे लोक एकत्र येतात. त्यामुळे त्यांच्यात सामाजिक ऐक्य निर्माण होते. त्यातूनच राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यास मदत होते.


Previous Post Next Post