सरकारने साम्यवादी चळवळ चिरडण्याचे ठरवले

सरकारने साम्यवादी चळवळ चिरडण्याचे ठरवले

विधाने सकारण स्पष्ट करा.

सरकारने साम्यवादी चळवळ चिरडण्याचे ठरवले.

उत्तर : 

कार्ल मार्क्स आणि त्याचा साम्यवाद यांचा परिचय भारतीयांना होऊ लागला होता. मानवेंद्रनाथ रॉय यांचा आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत सक्रिय सहभाग होता. 

१९२५ साली भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना झाली. कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य साम्यवादी तरुणांनी केले. सरकारने ही चळवळ चिरडण्याचे ठरवले. श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद, केशव नीळकंठ जोगळेकर इत्यादी नेत्यांना पकडण्यात आले. ब्रिटिश राज्य उलथून टाकण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांना वेगवेगळ्या शिक्षा करण्यात आल्या. 

Previous Post Next Post