टिपा लिहा विभाजी ऊती

टिपा लिहा विभाजी ऊती

 

 

प्रश्न

टिपा लिहा विभाजी ऊती

उत्तर

 

i) वनस्पतींच्या ठरावीक भागातच असणाऱ्या विभाजी ऊतींमुळे त्या भागातच वाढ सुरू होते. 

ii) या ऊतीच्या पेशीत ठळक केंद्रक, दाट जीवद्रव्य व भोवती पातळ पेशी भित्तीका असून त्या दाटीवाटीने रचलेल्या असतात. 

iii) या पेशींमध्ये बहुदा रिक्तिका नसतात. या पेशी अतिशय क्रियाशील असतात. वनस्पतींची वाढ करणे हे विभाजी ऊतींचे महत्त्वाचे कार्य आहे. याचे तीन प्रकार पडतात.

प्ररोह विभाजी ऊती - मूळ व खोडांच्या टोकाशी असतात. 

आंतरीय विभाजी ऊती - पानांच्या देठाच्या व फांदयांच्या तळाशी असतात. 

पार्श्व विभाजी ऊती - मूळ व खोडाच्या पार्श्व भागात असतात.


Previous Post Next Post