जैवतंत्रज्ञान म्हणजे काय ते स्पष्ट करून जैवतंत्रज्ञानाचा शेती व्यवस्थापनावर झालेला परिणाम स्पष्ट करा

जैवतंत्रज्ञान म्हणजे काय ते स्पष्ट करून जैवतंत्रज्ञानाचा शेती व्यवस्थापनावर झालेला परिणाम स्पष्ट करा

 

 

प्रश्न

जैवतंत्रज्ञान म्हणजे काय ते स्पष्ट करून जैवतंत्रज्ञानाचा शेती व्यवस्थापनावर झालेला परिणाम स्पष्ट करा.

उत्तर

 

नैसर्गिक गुणधर्माव्यतिरिक्त नवीन गुणधर्म धारण करणाऱ्या वनस्पती तसेच प्राणी यांची उत्पत्ती या तंत्रज्ञानाच्या मदतीने झाली आहे. मानवी फायदयांच्या उद्देशाने सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर, घडवून सुधारणा करण्याच्या प्रक्रियांना जैवतंत्रज्ञान असे म्हणतात.

जैवतंत्रज्ञानाचा शेती व्यवस्थापनावर झालेला परिणाम - i) पिकांच्या डी.एन.ए मध्ये बदल घडवून जनुकीय सुधारित वाण निर्माण केले जात आहेत. नव्या प्रजाती कृत्रिमरित्या निर्माण केल्या जातात. या प्रजातींमुळे निरनिराळे उपयुक्त गुणधर्म संकरित केले जातात. 

ii) जैवतंत्रज्ञानामुळे GM सुधारित प्रजाती कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत वाढतात. सातत्याने बदलणारे तापमान, ओले व सुके दुष्काळ, बदलते हवामान हे वातावरणीय ताण नैसर्गिक प्रजाती सहन करू शकत नाहीत. 

iii) उपद्रवी कीटक, रोगजंतू, रासायनिक तणनाशके यांना प्रतिकार करण्याची क्षमता ह्या प्रजातींमध्ये असल्याने जंतूनाशके, कीटकनाशके, तणनाशके अशा घातक रसायनांचा वापर टाळता येतो. 

iv) GM प्रजातीच्या बियाणांमुळे पिकांच्या नासाडीत घट होते व पोषणमूल्यांत वाढ होते.




Previous Post Next Post