आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली

आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली

विधाने सकारण स्पष्ट करा.

आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली.

उत्तर : 

१९४३ मध्ये जपानने अंदमान व निकोबार बेटे जिंकून आझाद हिंद सरकारच्या ताब्यात दिले. १९४४ मध्ये आझाद हिंद सेनेने म्यानमारमधील आराकानचा प्रदेश मिळवला. आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणी जिंकली. याच काळात आझाद हिंद सेनेला जपानकडून मिळणारी मदत बंद झाल्याने इम्फाळची मोहीम अर्धवट राहिली. मात्र प्रतिकूल परिस्थितीतही आझाद हिंद सेनेचे सैनिक नेटाने लढत होते; परंतु याच काळात जपानने शरणागती पत्करली. १८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली. 

Previous Post Next Post