आंतरजालाच्या माध्यमातून भारतामध्ये घडलेली भूस्खलनाची घटना शोधा व त्याविषयी थोडक्यात लिहा

आंतरजालाच्या माध्यमातून भारतामध्ये घडलेली भूस्खलनाची घटना शोधा व त्याविषयी थोडक्यात लिहा

आंतरजालाच्या माध्यमातून भारतामध्ये घडलेली भूस्खलनाची घटना शोधा व त्याविषयी थोडक्यात लिहा.

उत्तर :

हिमालय हा भूस्खलन प्रवण भूभाग आहे. जिथे भूस्खलनाच्या घटना नित्यनेमाने घडत असतात. या घटनांचा परस्पर संबंध इथल्या गतीय हालचालींशी थेट जोडला जाऊ शकतो, पण पश्चिम घाटात असा परस्पर संबंध जोडता येत नाही. इथे ज्या भूस्खलनाच्या घटना घडतात त्या बहुत करून पावसाशी जोडल्या जाऊ शकतात. पश्चिम घाटात दरवर्षी कुठे ना कुठे भूस्खलन घडत असते.

i) १८ जून २०१७ रोजी मेघालय येथील थारिया गावात भूस्खलन झाले. सतत एक आठवडा पाऊस व अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले. यात ६ नागरिक मृत्युमुखी पडले, तर अनेक जखमी झाले. अनेकांची घरे मातीखाली गेली असून अनेक नागरिक बेपत्ता झाले आहेत.

ii) ३० जुलै २०१५ पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात भीमाशंकरजवळ डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील दुर्गम भागात माळीण हे गाव वसलेले आहे. अतिवृष्टीमुळे पहाटे डोंगरकडा कोसळल्याने माळीण गावचे रहिवासी गाढ झोपेत असतानाच गावाचा सुमारे ७० टक्के भाग ढिगाऱ्याखाली गाडला गेला. त्यामध्ये स्त्री-पुरुष, लहान बालके असे सुमारे ४०० जण गाडले गेले, येत तसेच जनावरे, पाळीव प्राणीही गाडल्या गेले.

Previous Post Next Post