शेतकऱ्यांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व लिहा

शेतकऱ्यांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व लिहा

 

 

प्रश्न

शेतकऱ्यांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व लिहा

उत्तर

 

शेतकऱ्यांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व -

i) शेतकऱ्यांच्या मालाला योग्य किंमत मिळण्यासाठी विपणनाची आवश्यकत असते.

ii) शेतकऱ्यांना आपल्या मालाचे योग्य प्रकारे सादरीकरण करण्यासाठी विपणन महत्त्वाचे असते.

iii) शेतमालाची गुणवत्ता त्यानुसार होणारी प्रतवारी, तो माल ग्राहकांपुढे कशाप्रकारे सादर केला जातो, यांवरून त्या मालाची किंमत ठरते. जर शेतमालाबाबत कमतरता असली तर बाजारात त्याला योग्य किंमत मिळत नाही. म्हणून विपणन व्यवस्था महत्त्वाची असते.

iv) विपणनाद्वारे शेतकऱ्यांच्या शेतमालाची गुणवत्ता पाहून सुपरमार्केटमध्ये किंवा मोठ्या मॉलमध्ये त्या शेतमालाची जाहिरात करून तो विक्रीसाठी ठेवला जातो. त्यामुळे त्या शेतमालाला अधिक किंमत मिळते.



Previous Post Next Post