पृथ्वीच्या केंद्रावर 'g' चे मूल्य शून्य असते याविषयी स्पष्टीकरण लिहा
उत्तर :
वस्तूवर कार्य करणाऱ्या पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे, वस्तूतः गुरुत्वीय त्वरण (g) निर्माण होते. आपण पृथ्वीच्या आत, पृथ्वीच्या केंद्राकडे जसजसे जातो. तसतसे, गुरुत्वीय त्वरण कमी कमी होत जाते व पृथ्वीच्या केंद्रावर हे मूल्य शून्य असते ह्याचा अर्थ असा नाही की पृथ्वीच्या केंद्रस्थानी गुरुत्वीय बल नसते. पृथ्वीच्या केंद्रस्थानी विविध दिशेंनी हे बल कार्य करीत असते व त्याचे परिणामी बल (Resultant Force) शून्य असते. त्यामुळे गुरुत्वीय त्वरण सुद्धा शून्य असते.
पृथ्वीच्या आत जसजसे जातो तसतसे आपण पृथ्वीच्या आत ओढले जातो. आपल्या सभोवताल सर्वत्र पृथ्वीचे कण-भाग असतात व न्यूटनच्या नियमानुसार कोणत्याही दोन कणांमध्ये गुरुत्वीय बल असते. ह्या विविध दिशेंनी कार्य करणाऱ्या बलांचे परिणामी बलाचे मूल्य कमी कमी होत जाते व पृथ्वीच्या केंद्रस्थानी शून्य असते. अर्थात गुरुत्वीय त्वरण सुद्धा शून्य असते.