IVF ही संकल्पना स्पष्ट करा.
उत्तर :
i) In Vitro Fertilization चे IVF हे संक्षिप्त रूप आहे.
ii) अनेक दाम्पत्यांना विविध कारणांमुळे अपत्ये होत नाहीत. परंतु आधुनिक वैदयकशास्त्रामुळे आता या अडचणींवर मात करता येऊ शकते.
iii) IVF म्हणजे काचनलिकेतील फलन होय. या तंत्रामध्ये काचनलिकेमध्ये फलन घडवून आणले जाते आणि तयार झालेला भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केले जाते.
iv) शुक्रपेशींचे अल्प प्रमाण, अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे इत्यादी कारणांमुळे अपत्य होत नसेल तर IVF हे तंत्र वापरुन अपत्यप्राप्ती करता येते.
| काचनलिकेतील फलन |