लैंगिक प्रजननातील मातापित्याप्रमाणे नवीन जीव गुणधर्माबाबत साम्य दाखवतो हे विधान उदाहरणासह स्पष्ट करा.
उत्तर :
i) लैंगिक प्रजननात दोन जनक पेशींचा म्हणजे स्त्री युग्मक व पुंयुग्मकाचा समावेश होतो.
ii) या प्रक्रियेत दोन भिन्न युग्मकांच्या संयोगातून नवीन सजीवाची निर्मिती होते.
iii) त्यामुळे तयार होणाऱ्या नवीन जीवाकडे दोन्ही जनकांची विचरित जनुके असतात म्हणून तयार होणारा नवीन जीव काही गुणधर्माबाबत जनकांशी साम्य दाखवतो तर काही गुणधर्म जनकांपेक्षा वेगळे असतात. उदा. माता किंवा पित्याची शारीरिक किंवा मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होतात. जसे चेहऱ्याची ठेवण, वर्ण, केस, उंची तसेच काही विशिष्ट आनुवंशिक रोग इत्यादी.