खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे ऊर्जा रूपांतरण स्पष्ट करा
MrJazsohanisharma

खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे ऊर्जा रूपांतरण स्पष्ट करा

खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे ऊर्जा रूपांतरण स्पष्ट करा. 

अ.  औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र

आ. अणुविदयुत निर्मिती केंद्र

इ. सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र

ई. जलविद्युत निर्मिती केंद्र


उत्तर :

अ. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र : औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रास ऊर्जेचे पुढील प्रमाणे रूपांतर होते. यामध्ये वाफेवर चालणारे टर्बाइन वापरले जातात. कोळशाचे ज्वलन करून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग बॉयलरमध्ये पाणी तापवण्यासाठी केला जातो. या पाण्याचे रूपांतर उच्च तापमानाच्या आणि उच्च दाबाच्या वाफेत होते. या वाफेच्या शक्तींने टर्बाइन फिरते. त्यामुळे टर्बाइनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. याच वाफेचे रूपांतर पुनः पाण्यात करून ते बॉयलरकडे पाठवले जाते.

आ. अणुविदयुत निर्मिती केंद्र : अणू-ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रामध्येही, जनित्र फिरविण्यासाठी, वाफेवर चालणारे टर्बाइन वापरले जाते. इथे युरेनियम अथवा प्लुटोनियम सारख्या अणूंच्या अणुकेंद्रकाच्या विखंडनातून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग पाण्यापासून उच्च तापमानाची व दाबाची वाफ निर्माण करण्यासाठी केला जातो या वाफेच्या शक्तीने टर्बाइन फिरते त्यामुळे जनित्र फिरून विदयुत निर्मिती होते.

इ. सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र : सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात सूर्यकिरण परावर्तित करणारे अनेक परावर्तक वापरून सूर्यकिरण मनोऱ्यावरील एका शोषकावर केंद्रित केले जातात. यामुळे तेथे उष्णता ऊर्जा तयार उष्णतेच्या साहाय्याने पाण्यांचे रूपांतर वाफेत करून टर्बाइन आणि टर्बाइनद्वारे जनित्र फिरवले जाते व विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते.

ई. जलविद्युत निर्मिती केंद्र : जलविद्युत निर्मिती केंद्रात धरणात साठविलेल्या पाण्यातील स्थितिज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेत केले जाते. वाहते, गतिमान पाणी पाईपद्वारे धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या टर्बाइनपर्यंत आणून त्यातील गतिज ऊर्जेच्या आधारे टर्बाइन फिरवले जाते. टर्बाइनला जोडलेले जनित्र फिरून विदयुत निर्मिती होते.

Previous Post Next Post