भारतीय संविधाने स्त्रियांसाठी कोणकोणत्या तरतुदी केल्या आहेत
उत्तर :
स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय संविधानाने पुढील तरतुदी केल्या आहेत.
i) स्त्री-पुरुष समानतेची तत्त्वे स्वीकारली आहेत. त्यामुळे मतदानासारखा महत्त्वाचा राजकीय हक्क स्त्रियांना मिळाला.
ii) पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना शिक्षणाच्या, रोजगाराच्या समान संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या.
iii) सती, हुंडा, बहुपत्नीत्व यांसारख्या दुष्ट प्रथांवर कायदयाने बंदी घातली.
iv) स्त्रियांचा घटस्फोटाचा अधिकार मान्य करण्यात आला.
v) त्यांना मालमत्तेतही कायदेशीर वाटा दिला गेला.
vi) राजकीय सत्तेत स्त्रियांना न्याय्य वाटा देण्याच्या हेतूने स्थानिक शासन संस्थांमध्ये काही जागा राखून ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व तरतुदींमुळे आज आपल्याला असे दिसते, की स्त्रिया शिक्षण घेऊन अर्थार्जन करू लागल्या आहेत.