प्राणी वर्गीकरणाच्या पद्धती कशा बदलत गेल्या आहेत
उत्तर :
i) वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेळोवेळी प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला.
ii) ग्रीक तत्ववेत्ता ॲरिस्टॉटल यांनी सर्वांत पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण केले होते. त्यांनी शरीराचे आकारमान, त्यांच्या सवयी, अधिवास यासारख्या मुद्द्यांच्या आधारे वर्गीकरण केले होते.
iii) विज्ञानातील प्रगतीनुरूप पुढे संदर्भ बदलत गेले व त्यानुसार वर्गीकरणाचे मुद्देसुद्धा बदलले.
iv) ॲरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला 'कृत्रिम पद्धत' म्हणतात.
v) त्यांच्या व्यतिरिक्त थेओफ्रेस्टस, प्लिनी, जॉन रे, लिनियस यांनी सुद्धा वर्गीकरणाच्या कृत्रिम पद्धतीचा अवलंब केला होता.
vi) कालांतराने वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला.
vii) वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धतही सजीवांचे शरीररचनेविषयी गुणधर्म, त्यांच्या पेशी, गुणसूत्र, जैवरासायनिक गुणधर्म यासारख्या मुद्द्यांवर आधारित होती.
viii) कालांतराने उत्क्रांतिवादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धत अमलात आणली गेली.
ix) डॉब्झंस्की आणि मेयर यांनी या पद्धतीचा अवलंब करून प्राण्यांचे वर्गीकरण केले.
x) अलिकडच्या काळात कार्ल वुज यांनी युद्धा प्राण्यांचे वर्गीकरण केलेले आहे. अशाप्रकारे वर्गीकरणाच्या पद्धती बदलत गेल्या.