रचनात्मक संघटन व सममिती यामध्ये नेमका काय फरक आहे ? उदाहरणांसहीत स्पष्ट करा.
उत्तर :
रचनात्मक संघटन व सममिती हे प्राणी वर्गीकरणाच्या नवीन पद्धतीसाठी वापरलेले आधारभूत मुद्दे असून रचनात्मक संघटनात प्राण्यांच्या शरीरात पेशी किंवा ऊती यांद्वारे अवयव तयार होणे यावर रचनात्मक संघटनाचे प्रकार पडतात तर सममितीमध्ये प्राण्यांच्या शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद घेतला असता त्या शरीराचे दोन समान भाग होतात की नाही या गुणधर्मावर आधारित प्राण्यांच्या शरीराचे विविध प्रकार पडतात.
उदा. - i) रचनात्मक संघटन : रंध्रीय संघातील प्राणी, नीडारीया संघातील प्राणी, चपटे कृमी.
ii) सममिती : अमिबा (असममित शरीर), तारामासा (अरिय सममिती), मानव (द्विपार्श्व सममिती).