फलप्रक्रिया उद्योगाचे मानवी जीवनातील महत्त्व विषद करा
उत्तर :
i) फळप्रक्रिया उद्योग हा फळे अधिक काळासाठी साठवून ठेवण्यासाठीची प्रक्रिया करण्याचा उद्योग आहे. हा शेतीपूरक व्यवसाय आहे तसेच यासाठी मोठे कारखानेही असतात.
ii) फळांपासून बनविलेली अनेक प्रकारची उत्पादने आपण दैनंदिन जीवनात वापरत आहोत. उदा. चॉकलेट, सरबते, जॅम, जेली इत्यादी या सर्व वस्तू फळांवर प्रक्रिया करून मिळविल्या जातात.
iii) प्रक्रिया केल्यामुळे फळे बिगर हंगामात उपलब्ध होतात. त्यामुळे त्यांची वर्षभर चव चाखता येते.
iv) ज्या भागात फळे पिकत नाहीत अशा ठिकाणी त्या उपलब्ध करून देता येतात.
v) बाजारपेठेत फळांची आवक वाढून दर घसरतो. अशा स्वस्त फळांवर प्रक्रिया करून चांगली किंमत मिळविता येते.
vi) प्रक्रियायुक्त फळे निर्जंतुक केल्यामुळे खाण्यासाठी सुरक्षित असतात.
vii) आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रक्रियायुक्त डबाबंद फळे व त्यापासून तयार झालेले पदार्थ यांचा उपयोग होतो.
viii) विशिष्ट फळे ज्या देशात पिकत नाहीत, अशा ठिकाणी निर्यात करून परकीय चलन मिळविता येते.