जमातवाद नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे
उत्तर :
सर्वांनी धार्मिक जमातवादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे.
i) त्यासाठी भिन्नधर्मीय लोकांत आपण मिसळले पाहिजे. उत्तर चालीरीती, सद्विचार आपण स्वीकारले पाहिजेत.
ii) परस्परांच्या सणउत्सवांत सहभागी झाले पाहिजे.
iii) एकमेकांच्या चांगल्या चालीरीती, सद्विचार आपण स्वीकारले पाहीजेत.
iv) आपल्या सामाजिक आर्थिक प्रश्नांकडे आपणांस तर्कशुद्ध पद्धतीने पाहता आले पाहिजे. या प्रश्नांची धर्माशी गल्लत करता कामा नये. हे सर्व जमातवाद नष्ट करण्यासाठी केले पाहिजे.