भारताचे अमेरिकेशी असणारे दृढसंबंध भारताच्या आर्थिक विकासाला पोषक ठरतात असे तुम्हांस वाटते का ? सकारण स्पष्ट करा
उत्तर :
भारताचे अमेरिकेशी असणारे दृढसंबंध भारताच्या आर्थिक विकासाला पोषक ठरतात असे मला वाटते. कारण - i) भारत आणि अमेरिका ही लोकशाही व्यवस्था असलेली दोन बलाढ्य राष्टे आहेत.
ii) भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यानंतर हळूहळू भारताचा आर्थिक प्रगतीचा वेग वाढू लागला आहे. त्याचा परिणाम भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध अधिक दृढ होण्यात झाला.
iii) भारतीय लोक शिक्षण नोकरी या निमित्ताने अमेरिकेत जात होते. तेथे लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे भारताचा आर्थिक विकास होतो.