भारताचे शेजारच्या राष्ट्रांशी तणावपूर्ण संबंध असल्याने अंतर्गत विकास साधण्यात अडथळे निर्माण होतात' या विधानाशी तुम्ही सहमत आहात का ? सकारण स्पष्ट करा.
उत्तर :
'भारताचे शेजारच्या राष्ट्रांशी तणावपूर्ण संबंध असल्याने अंतर्गत विकास साधण्यात अडथळे निर्माण होतात' या विधानाशी मी सहमत आहे. कारण - i) भारताच्या शेजारी असणाऱ्या राष्ट्राचे आपल्या राष्ट्राशी असणारे संबंध, त्या राष्ट्राची सैनिकी शक्ती, युद्धसाहित्य, शस्त्रास्त्रे या सर्वांचा प्रभाव अंतर्गत विकासात होतो.
ii) शेजारच्या राष्ट्रांशी तणावपूर्ण संबंध असल्याने कधीकधी युद्धाचे प्रसंग ओढवतात. त्यातून जीवित हानी व वित्तहानी निर्माण होते. त्यामुळे अंतर्गत विकास होऊ शकत नाही.
iii) सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी परस्परांवर अवलंबून असतात. जर त्यांमध्ये तणावपूर्ण संबंध असेल तर अंतर्गत विकास साधण्यात अडथळे निर्माण होतील. त्यातून देशाच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवेल. याकडे शासनाला अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. आणि अंतर्गत विकास साधण्यात अडथळे निर्माण होईल.