सूक्ष्मजैविक प्रक्रियांनी कोणकोणती इंधने मिळवता येतात? ह्या इंधनांचा वापर वाढवणे का गरजेचे आहे?
उत्तर :
i) मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या नागरी, शेतकी, औद्योगिक कचऱ्याचे सूक्ष्मजैविक विनॉक्सी-अपघटन करून मिथेन वायू हे इंधन मिळते.
ii) सॅकरोमायसिस किण्व जेव्हा ऊसाच्या मळीचे किण्वन करते तेव्हा मिळणारे इथॅनॉल अल्कोहोल हे एक स्वच्छ धूररहित इंधन आहे.
iii) हायड्रोजन वायूपासून इंधन मिळवता येते. 'हायड्रोजन वायू' हे भविष्यातील इंधने मानले जाते.
या इंधनाचा वापर वाढवणे गरजेचे आहे. कारण हे इंधन धूररहित असून या इंधनापासून कोणतेही प्रदूषण होत नाही. तसेच ही इंधने भविष्यकाळात भरवशाची अशी आहेत.