समुद्र किंवा नदीच्या तेलाचे तवंग कसे नष्ट केले जातात
उत्तर :
i) अल्कॅनिव्होरॅक्स बॉरक्युमेन्सिस व स्युडोमोनास जीवाणूंमध्ये समुद्र किंवा नदीच्या तेलाचे तवंग नष्ट करण्याची क्षमता असते. समुद्रातील/ नदीतील तेलाचे तवंग नष्ट करायला या जीवाणूंच्या समूहाचा वापर केला जातो.
ii) या जीवाणूंच्या समूहाला हायड्रोकार्बनोक्लास्टिक बॅक्टेरिआ म्हणतात. हे बॅक्टेरिआ हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा ऑक्सिजनशी संयोग घडवून आणतात. या अभिक्रियेत CO2 व पाणी तयार होते.