संकल्पना स्पष्ट करा जयपूर फूट तंत्रज्ञान
उत्तर :
i) 'जयपूर फूट' तंत्रज्ञानाच्या शोधाने भारतातील दिव्यांगांचे आयुष्य बदलून गेले.
ii) १९६८ पूर्वी एखाद्या व्यक्तीला अपघात झाला आणि त्यात पाय जायबंदी झाला तर उर्वरित आयुष्य अडचणीत काढावे लागे. यावर उपाय म्हणून डॉ. प्रमोद सेठी यांनी कुशल कारागीर रामचंद्र शर्मा यांच्या मदतीने कृत्रिम हात, पाय, नाक, कान तयार केले.
iii) जयपूर फूट तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या कृत्रिम अवयवांमुळे दिव्यांग रूग्ण अनवाणी व खडबडीत जमिनीवरून चालणे, पळणे, सायकल चालवणे, शेतातील कामे करणे, झाडावर चढणे व गिर्यारोहण करणे अशी कामे सहजपणे करू शकतात.
iv) या कृत्रिम पायांवर बूट घालण्याची गरज नसल्याने बुटांचा खर्च वाचतो. पाण्यात वा ओल्या स्थितीत काम करण्यासाठी हे पाय सोईचे आहेत.