वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप स्पष्ट करा
उत्तर :
i) बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव वृत्तपत्रांवर आणि प्रसारमाध्यमांवर पडला आहे. \
ii) पूर्वी वृत्तपत्रे कृष्णधवल रंगांत छापली जात होती. पुढे काळ बदलला आणि वृत्तपत्रे रंगीत झाली.
iii) पूर्वी तालुका किंवा जिल्ह्याचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांना खूप मोठ्या प्रमाणात राज्यस्तरीय साखळी स्वरूपाच्या पत्रांशी स्पर्धा करावी लागत आहे.
iv) वृत्तपत्रे आता अधिक सक्रीय होऊ लागली आहेत. अशा प्रकारे वृत्तपत्राचे स्वरूप बदलले आहे.