सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा घ्या

सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा घ्या

सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा घ्या

उत्तर :

सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या ठळक घडामोडींचा आढावा पुढीलप्रमाणे घेता येईल.

i) भारतीय संविधानात शासनाचे प्राथमिक कर्तव्य म्हणून भारतीय जनतेचे राहणीमान वाढवावे सुपोषण साधावे व सार्वजनिक आरोग्यही सुधारावे असे नमूद केले आहे. 

ii) सहाव्या पंचवार्षिक योजनेत प्राथमिक स्वरूपाची आरोग्यसेवा तसेच वैदयकीय सेवा ग्रामीण भागातील लोक, आदिवासी व गरीब लोकांना उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट होते. 

iii) भारतात आरोग्याच्या संदर्भात अँलोपॅथी, युनानी, होमिओपॅथी, आयुर्वेद आणि निसर्गोपचार पद्धतींना मान्यता देऊन लोकांचे आरोग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न सुरू झाला. 

iv) आरोग्याच्या क्षेत्रातील बदलांमुळे भारतीयांचे जीवन अधिकाधिक चिंतारहित होण्यास मदत झाली. 

v) १९६२ मध्ये तमिळनाडुमधील वेल्लूर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या इस्पितळात डॉ.एन. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात 'ओपन हार्ट शस्त्रक्रिया' यशस्वी करण्यात आली. त्यामुळे अशा उपचारांसाठी परदेशी जाण्याची गरज राहिली नाही. 

vi) 'जयपूर फूट' च्या शोधाने भारतातील दिव्यांगांचे आयुष्य बदलून गेले. १९६८ पूर्वी एखाद्या व्यक्तीला अपघात झाला आणि त्यात त्याचा पाय जायबंदी झाला. तर उर्वरित आयुष्य अडचणीत काढावे लागे. यावर उपाय म्हणून डॉ. प्रमोद सेठी यांनी कुशल कारागीर रामचंद्र शर्मा यांच्या मदतीने कृत्रिम हात, पाय, नाक, कान तयार केले.

Previous Post Next Post