ग्लायकोलायसीस प्रक्रिये विषयी सविस्तर लिहा

ग्लायकोलायसीस प्रक्रिये विषयी सविस्तर लिहा

ग्लायकोलायसीस प्रक्रिये विषयी सविस्तर लिहा

उत्तर :



i) ग्लायकोलायसीस ही एक सजीवांच्या चयापचायातील एक चक्र होय. ही एक जैवरासायनिक अभिक्रियेची शृंखला आहे. 

ii) यामध्ये ग्लायको म्हणजे ग्लुकोज आणि लायसिस म्हणजेच विघटन म्हणजेच 'ग्लुकोजचे विघटन' होय.

iii) पेशीश्वसनातील हा पहिला टप्पा सर्व सजीवांत सारखाच असतो. 

iv) ही प्रक्रिया पेशी द्रव्यांत घडून येते यासाठी ऑक्सिजनची गरज नसते. 

v) या प्रक्रियेत सहा कार्बनी ग्लुकोजचे रूपांतर तीन कार्बनी पायरुविक आम्ल (पायरुवेट) यामध्ये होते. 

vi) कमीत कमी सहा विकर या प्रक्रियेत कार्यरत असतात.

vii) यातील पहिल्या आणि तिसऱ्या पायरीमध्ये ATP चे दोन रेणू तयार होतात. 

viii) पुढे सहा-कार्बन ग्लुकोज रेणूचे रूपांतर मध्यंतरी उत्पादकात होते जे दोन तीन-कार्बन संयुगात विभागले जाते.

ix) प्रक्रियेच्या शेवटी काही रूपांतर होऊन पायरुविक आम्ल तयार होते. 

x) ग्लायकोलायसिसच्या शेवटच्या पायरीमध्ये क्रियेच्या दरम्यान घडलेल्या रासायनिक अभिक्रियेपासून मिळालेल्या ऊर्जेचे 4ATP रेणू तयार होतात. 

xi) म्हणूनच या प्रक्रियेत पूर्ण 4ATP रेणू तया होतात, ज्यामधील 2ATP रेणू प्रक्रिये दरम्यान वापरले जातात, ज्यामुळे शेवटी 2ATP रेणू मिळतात. अशाप्रकारे ग्लुकोजचे विघटन घडून येते.

Previous Post Next Post