टिपा लिहा IVE

टिपा लिहा IVE

 

प्रश्न 

टिपा लिहा IVE


 उत्तर 

 

i) IVF म्हणजे In Vitro Fertilization, म्हणजेच शरीराबाहेर फलन.

ii) आधुनिक वैद्यकशास्त्रातील हे तंत्रज्ञान ज्यांना मूल हवे आहे अशा अपत्यहीन दाम्पत्यांसाठी वापरण्यात येते. 

iii) शुक्रपेशींचे अल्प प्रमाण, अंडपेशीचा अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे या कारणांवर मात करण्यासाठी हे तंत्र वापरतात.

iv) मातेची अंडपेशी बाहेर काढून ती काचनलिकेत ठेवली जाते. त्यावर पित्याच्या • शुक्रपेशी सोडून काचनलिकेतच फलन केले जाते.

v) हे फलित झालेले युग्मनज नंतर मातेच्या गर्भाशयात रोपण केले जाते. अशा तंत्राने अपत्यप्राप्ती करता येते.



Previous Post Next Post