टिपा लिहा हायड्रामधील मुकुलायन

टिपा लिहा हायड्रामधील मुकुलायन

 

प्रश्न 

टिपा लिहा हायड्रामधील मुकुलायन


 उत्तर 

 

i) बहुपेशीय प्राण्यांमध्ये मुकुलायन ही अलैंगिक प्रजनन पद्धती आहे. 

ii) पूर्ण वाढ झालेल्या हायड्राला जर पोषक वातावरण मिळाले, तर त्याच्या शरीरभित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी फुगवटा तयार होतो. या फुगवट्यास मुकुल म्हणतात.

iii) पुनर्जनन पेशींच्या विभाजनाने मुकुल तयार होतो. यथावकाश मुकुलाची वाढ होऊन त्याचे रूपांतर छोट्या हायड्रामध्ये होते.

iv) या नव्याने तयार झालेल्या हायड्राच्या शरीराचे स्तर आणि पचन-गुहा हे जनक हायड्राच्या अनुक्रमे शरीर-स्तर आणि पचन- गुहेशी संलग्न असतात. नवा हायड्रा जनक हायड्राकडून पोषण घेतो.

v) या हायड्राची वाढ स्वतःचे अस्तित्व टिकवण्याइतपत झाली की तो जनक हायड्रापासून वेगळा होतो व स्वतंत्र आणि निरावलंबी जीवन जगू लागतो.





Previous Post Next Post