संकल्पना स्पष्ट करा अभिलेखागार

संकल्पना स्पष्ट करा अभिलेखागार

प्रश्न 

संकल्पना स्पष्ट करा अभिलेखागार

 उत्तर 


i) ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात, त्या ठिकाणास 'अभिलेखागार' असे म्हणतात.

ii) अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट, जागतिक करारांचे ऐवज इत्यादी जतन करून ठेवले जाते.

iii) अभिलेखागारांमुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात. तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो. तत्कालीन भाषा, लिपी यांचा शोध घेता येतो. कालगणना करता येते. ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना हस्तांतरित करता येतो. 

iv) भारताचे दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागार हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. भारतातील प्रत्येक राज्याचे स्वत:चे स्वतंत्र अभिलेखागारही आहे

Previous Post Next Post