संकल्पना स्पष्ट करा वेब पत्रकारिता

संकल्पना स्पष्ट करा वेब पत्रकारिता

प्रश्न 

संकल्पना स्पष्ट करा वेब पत्रकारिता

 उत्तर 


i) आधुनिक काळात मुद्रण तंत्रज्ञानात संगणक आणि महाजाल (इंटरनेट) यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे पत्रकारिता क्षेत्रातही बदल झाले आहेत.

ii) संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या पत्रकारितेस 'वेब पत्रकारिता' असे म्हणतात.

iii) सोशल मीडिया, वेब न्यूज पोर्टल्स, वेब चॅनल्स, ट्विटर, फेसबुक, मायस्पेस, यू ट्यूब यांसारख्या वेब माध्यमांद्वारे वाचकांसाठी माहिती उपलब्ध करून दिली जाते. 

iv) ही माहिती इंग्रजी व सर्व भारतीय भाषांमधून दिली जाते. वेब पत्रकारिता व सोशल मीडिया आज प्रभावीरीत्या कार्य करीत असले, तरी त्यावरील बातम्या व माहिती तपासून, खात्री करून घेणे आवश्यक असते.

Previous Post Next Post