समजातीय श्रेणी म्हणजे काय ? समजातीय श्रेणीची महत्त्वाची दोन वैशिष्ट्ये लिहा

समजातीय श्रेणी म्हणजे काय ? समजातीय श्रेणीची महत्त्वाची दोन वैशिष्ट्ये लिहा

समजातीय श्रेणी म्हणजे काय ? समजातीय श्रेणीची महत्त्वाची दोन वैशिष्ट्ये लिहा.

उत्तर : 

समजातीय श्रेणी : कार्बनी संयुगामध्ये कार्बन शृंखलेची लांबी वेगवेगळी असली तरी त्यांच्यातील क्रियात्मक गट एकच असल्याने त्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये खूप साधर्म्य असते. क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलांवर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे संयुगांची जी श्रेणी तयार होते, अशा श्रेणीला समजातीय श्रेणी म्हणतात. लगतच्या दोन संयुगांमध्ये (वरच्या व खालच्या) एक - CH2 - गटाचा फरक असतो.

उदाहरणे :

अल्केन : अल्केन कुल हे समजातीय श्रेणीचे आहे आणि त्याचे सामान्य सूत्र CnH2n+2 असे आहे. 



समजातीय श्रेणीची वैशिष्ट्ये : 

i) समजातीय श्रेणीमध्ये चढत्या क्रमाने जाताना - (अ) एका मेथिलिन (CH2) घटकाची भर पडते. (आ) रेणुवस्तुमान 14u ने वाढते. (इ) कार्बन अणूंची संख्या 1 ने वाढते. 

ii) समजातीय श्रेणीतील संयुगात समान क्रियात्मक गट असल्याने रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य असते.

iii) समजातीय श्रेणीच्या सर्व संयुगांसाठी एकच सामान्य रेणुसूत्र असते. 

iv) समजातीय श्रेणीत चढत्या क्रमाने जाताना संयुगांच्या उत्कलनांक, द्रवणांक यांसारख्या भौतिक गुणधर्मांमध्ये प्रवणता दिसून येते..

Previous Post Next Post