क्रियात्मक गट म्हणजे काय ? उदाहरणे देऊन संज्ञा स्पष्ट करा

क्रियात्मक गट म्हणजे काय ? उदाहरणे देऊन संज्ञा स्पष्ट करा

क्रियात्मक गट म्हणजे काय ? उदाहरणे देऊन संज्ञा स्पष्ट करा. 

उत्तर : 

i) सेंद्रिय संयुगातील विषम अणू किंवा विषम अणूंचा गट यामुळे कार्बनी संयुगाला विशिष्ट गुणधर्म प्राप्त होतात; म्हणून या विषम अणू किंवा विषम अणूंनी युक्त अणुगटांना क्रियात्मक गट म्हणतात.

ii) सर्व सेंद्रिय संयुगे ही कार्बनवर रासायनिक अभिक्रिया होऊन मिळालेली नवीन संयुगे असतात. संयुगातील एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन अणूंचे विस्थापन करून त्या जागी दुसऱ्या विषम अणूंना किंवा विषम अणुगटांना स्थापित करतात. या विस्थापनानंतर नवीन संयुग तयार होते, ज्याचे कार्य हे मूळ हायड्रोकार्बनपेक्षा भिन्न असते.

iii) हायड्रोकार्बन मीथेन (CH4) मधील एक हायड्रोजन - OH गटाने विस्थापित केला, तर मिथिल अल्कोहोल (CH3 - OH) हे संयुग मिळते. यातील - OH गट हा अल्कोहोलिक क्रियात्मक गट आहे.




Previous Post Next Post