टिपा लिहा योगर्ट्स उत्पादन

टिपा लिहा योगर्ट्स उत्पादन

 

प्रश्न 

टिपा लिहा योगर्ट्स उत्पादन

 उत्तर 

 

i) योगर्ट्स ही दुग्धजन्य उत्पादने आहेत.

ii) औद्योगिक पद्धतीने योगर्ट्स उत्पादन करताना दुधात प्रथिनांसाठी दुधाची पावडर मिसळली जाते.

iii) दूध तापवून कोमट केले जाते.

iv) नंतर त्यात स्ट्रेप्टोकॉकस थर्माफिलीस व लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी या जीवाणूंचे 1: 1 या प्रमाणातील मिश्रण मिसळले जाते.

v) स्ट्रेप्टोकॉकस दुधापासून लॅक्टिक आम्ल तयार करतात. त्याने प्रथिनांचे जेल बनून दह्याला घट्टपणा येतो.

vi) लॅक्टोबॅसिलसमुळे अँसेटालडीहाईडसारखी संयुगे बनतात व दह्याला विशिष्ट स्वाद मिळतो.

vii) योगर्टचे पाश्चरीकरण केल्यास ते जास्त काळ टिकते आणि त्यापासून प्रोबायोटिक गुणधर्म मिळतात. 

viii) योगर्टमध्ये फळांचे रस इत्यादी मिसळून विविध स्वाद निर्माण केले जातात. 

उदा., स्ट्रॉबेरी योगर्ट, बनाना योगर्ट.



Previous Post Next Post