लघुदृष्टी किंवा निकटदृष्टिता म्हणजे काय ? त्याची संभाव्य कारणे सांगा. या दोषाचे निराकरण कसे करतात? आकृत्यांसह स्पष्ट करा.

उत्तर : 

ज्या दृष्टिदोषामध्ये मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, पण दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाहीत, म्हणजे डोळ्याचा दूरबिंदू अनंत अंतरावर नसून तो जवळ असतो, त्या दोषास लघुदृष्टी किंवा निकटदृष्टिता म्हणतात. या दोषामध्ये दूरच्या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलाच्या अलीकडे तयार होते. [आकृत्या 1 (a) व (b)]

निकटदृष्टिता

निकटदृष्टिता

या दोषाची संभाव्य कारणे : i) डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती जास्त असते.

ii) नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टिपटल यांच्यामधील अंतर वाढते.

योग्य नाभीय अंतर असलेल्या अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून या दोषाचे निराकरण करतात. या भिगामुळे प्रकाशकिरणांचे योग्य प्रमाणात अपसरण होऊन नंतर ते नेत्रभिंगावर पडतात. त्यानंतर नेत्रभिंगामुळे प्रकाशकिरणांचे अभिसरण होऊन दृष्टिपटलावर प्रतिमा तयार होते. (आकृती c)

Previous Post Next Post