दूरदृष्टिता म्हणजे काय ? त्याची संभाव्य कारणे लिहा. या दोषाचे निराकरण तर कसे करतात? आकृत्यांसह स्पष्ट करा.

उत्तर :

 ज्या दोषामध्ये मानवी डोळा दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, पण जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही, म्हणजे डोळ्याचा निकटबिंदू 25 cm अंतरावर न राहता दूर असतो, त्या दोषास दूरदृष्टिता म्हणतात. यात जवळच्या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलाच्या मागे तयार होते. [आकृत्या (a) व (b) ]

दूरदृष्टिता

दूरदृष्टिता

या दोषाची संभाव्य कारणे :  i) डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता कमी झाल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती कमी असते. 

ii) नेत्रगोल उभट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टिपटल यांच्यातील अंतर कमी होते. 

योग्य नाभीय अंतर असलेल्या बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरून या दोषाचे निराकरण करतात. जवळच्या वस्तूपासून येणाऱ्या प्रकाशकिरणांचे आधी बहिर्गोल भिंगामुळे योग्य प्रमाणात अभिसरण होऊन मग ते डोळ्यातील भिंगापर्यंत पोहोचतात व नंतर डोळ्यातील भिंगामुळे अभिसरण होऊन प्रतिमा दृष्टिपटलावर तयार होते. [आकृती c]

Previous Post Next Post