धातू आणि अधातू गुणधर्म आवर्तात आणि गणात कसे बदलत जातात

धातू आणि अधातू गुणधर्म आवर्तात आणि गणात कसे बदलत जातात

धातू आणि अधातू गुणधर्म आवर्तात आणि गणात कसे बदलत जातात

उत्तर :

i) धातूंमध्ये संयुजा-इलेक्ट्रॉन गमावून राजवायू संरुपण असलेला धनायन बनण्याची प्रवृत्ती असते. मूलद्रव्यांची ही प्रवृत्ती अथवा विद्युत धनता म्हणजेच त्या मूलद्रव्याचा धातु-गुणधर्म होय. 

ii) अधातूमध्ये विद्युत ऋणतेमुळे बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारून पूर्ण अष्टक स्थितीमधील ऋणायन बनण्याची प्रवृत्ती असते. मूलद्रव्याची ही प्रवृत्ती अथवा विद्युत ऋणता म्हणजे मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म होय. 

iii) कोणत्याही गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडून केंद्रक व संयुजा-इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढत जाते. त्यामुळे परिणामी केंद्रकीय प्रभार कमी होऊन संयुजा-इलेक्ट्रॉनांवरील आकर्षण बल कमी होते. यामुळे संयुजा-इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती वाढते. तसेच संयुजा-इलेक्ट्रॉन गमावल्यावर उपांत्य कवच बाह्यतम ठरते. हे उपांत्य कवच पूर्ण अष्टक असल्यामुळे तयार झालेल्या धनायनाला विशेष स्थैर्य प्राप्त होते. संयुजा-इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती म्हणजेच धातु-गुणधर्म. कोणत्याही गणात वरून खाली जाताना विदयुत धनता वाढत जाते व मूलद्रव्याचा धातु-गुणधर्म वाढत जातो. 

iv) एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच तेच राहते. मात्रा केंद्रकावरील धनप्रभार वाढत गेल्याने, अणुत्रिज्या कमी होते व यामुळे प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभारसुद्धा वाढत जातो. त्यामुळे संयुजा-इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती कमी कमी होत जाते. म्हणजेच आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना विदयुत ऋणता वाढत जाते. व मूलद्रव्यांचा धातु-गुणधर्म कमी कमी होत जातो. 

v) एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणाऱ्या विद्युत ऋणतेमुळे बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारून पूर्ण अष्टक स्थितीमधील ऋणायन बनण्याची अणूची क्षमता वाढते. ही प्रवृत्ती म्हणजेच अधातु-गुणधर्म. कोणत्याही आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना विद्युत ऋणता वाढत जाते. अधातु-गुणधर्म वाढत जातो.

Previous Post Next Post