कृत्रिम उपग्रह म्हणजे काय? त्याचे कोणतेही दोन उपप्रकार सांगून प्रत्येकाचे कार्य लिहा.

कृत्रिम उपग्रह म्हणजे काय? त्याचे कोणतेही दोन उपप्रकार सांगून प्रत्येकाचे कार्य लिहा.

प्रश्न

 कृत्रिम उपग्रह म्हणजे काय? त्याचे कोणतेही दोन उपप्रकार सांगून प्रत्येकाचे कार्य लिहा.

उत्तर

एखादे मानवनिर्मित यंत्र पृथ्वीच्या किंवा एखादया ग्रहाच्या नियमित कक्षेत परिक्रमा करीत असेल तर त्या यंत्रास कृत्रिम उपग्रह म्हणतात.

i) हवामान उपग्रह : हवामानाचा अभ्यास व हवामानाचा अंदाज वर्तवणे.

ii) दळणवळण उपग्रह : जगभरातील प्रदेशांमध्ये विशिष्ट विद्युतचुंबकीय लहरीद्ववारे संपर्क साधणे.

iii) ध्वनी- चित्र प्रक्षेपक उपग्रह : दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे प्रक्षेपण करणे.

iv) दिशादर्शक : कुठल्याही भौगोलिक स्थानाचे अक्षांश व रेखांश निश्चित करणे. 

v) सैनिकी उपग्रह : देशाचे संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून माहिती संकलन करणे.

vi) पृथ्वी निरीक्षक उपग्रह : पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जंगले, वाळवटे, सागर, ध्रुव प्रदेशावरील बर्फ यांचा अभ्यास. तसेच नैसर्गिक संसाधनांचा शोध व व्यवस्थापन, महापूर,  ज्वालामुखी उद्रेक, वादळ इत्यादी आपत्तींमध्ये निरीक्षण व मार्गदर्शन करणे.

Previous Post Next Post