प्रश्न | चीज निर्मिती यावर थोडक्यात टीप लिहा |
उत्तर | चीज निर्मिती : i) गाईच्या दुधाचे रासायनिक आणि सूक्ष्मजैविक परीक्षण करून त्यात तीन प्रकारचे सूक्ष्मजीव (लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रिमॉरिस व स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलिस) व रंग मिसळले जातात. ii) तयार झालेल्या दह्यातील पाणी काढून, त्यात रेनेट किंवा प्रोटीएज हे विकर घातले जाते. iii) घट्ट झालेल्या दयाचे तुकडे कापून, रगडून ते धुतले जातात. iv) या मिश्रणात मीठ आणि रंग, स्वाद इत्यादी घालण्यात येतात. अशा रितीने बनलेले चीज परिपक्व बनवण्यासाठी साठवले जाते. |