प्रश्न | निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो |
उत्तर | हे विधान बरोबर आहे कारण - i) लोकशाही मजबूत बनण्यासाठी न्याय्य व खुल्या वातावरणात निवडणुका होणे आवश्यक असते. ii) परंतु काही वेळा निवडणूक प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार होतो. iii) बनावट मतदान होणे, मतदानासाठी पैसे वा वस्तूंचे वाटप होणे, मतदार वा मतपेट्या पळवून नेणे असे प्रकार वाढत जातात. त्यामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो. |