टिपा लिहा सरस्वती महाल ग्रंथालय

टिपा लिहा सरस्वती महाल ग्रंथालय

प्रश्न 

टिपा लिहा सरस्वती महाल ग्रंथालय


 उत्तर 

 

i) सोळाव्या-सतराव्या शतकातील नायक राजांच्या काळात तमिळनाडूमधील तंजावर येथे 'सरस्वती महाल ग्रंथालय' बांधले गेले. 

ii) व्यंकोजीराजे भोसले यांनी १६७५ साली तंजावर जिंकल्यानंतर त्यांनी व  त्यांच्या वंशजांनी हे ग्रंथालय अधिक समृद्ध केले. 

iii) या ग्रंथालयात सुमारे ४९००० ग्रंथ आहेत. हे प्राचीन ग्रंथ हा इतिहासाच फार मोठा ठेवा आहे. तत्कालीन महत्त्वाची कागदपत्रे, मोडी लिपीतील ग्रंथ, दस्तऐवज या ग्रंथालयात संग्रहित केलेले आहेत. प्राचीन इतिहासाची ती महत्त्वाची साधने आहेत. 

iv) हे ग्रंथालय समृद्ध करण्यात सरफोजीराजे भोसले यांचे मोठे योगदान असल्याने १९१८ मध्ये या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले.

Previous Post Next Post