टिपा लिहा भारतीय संस्कृती कोश

टिपा लिहा भारतीय संस्कृती कोश

प्रश्न 

टिपा लिहा भारतीय संस्कृती कोश

 उत्तर 

 

i) पंडित महादेवशास्त्री जोशी यांनी १९६२ ते १९७९ या प्रदीर्घ काळात 'भारतीय संस्कृती कोशा' चे दहा खंड प्रसिद्ध केले.

ii) या कोशामध्ये त्यांनी संपूर्ण भारताचा इतिहास, भूगोल, भिन्न भाषक लोक, त्यांनी घडवलेला इतिहास यांची माहिती दिलेली आहे.

iii) महाराष्ट्रीय आणि भारतीय संस्कृतीची तपशीलवार माहिती, लोकांचे संण-उत्सव, पारंपरिक विचार, रूढी-परंपरा या सर्वांची दखल या कोशात घेण्यात आलेली आहे. 

iv) विविध ललितकला, पारंपरिक वस्तू, सण, देवता यांची वाचकाला कल्पना यावी म्हणून चित्रांचाही वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे वाचकांना, अभ्यासकांना आणि इतिहासलेखनालाही हे कोश उपयुक्त ठरतात.


Previous Post Next Post