थोडक्यात टिपा लिहा धनाग्रीकरण

थोडक्यात टिपा लिहा धनाग्रीकरण

थोडक्यात टिपा लिहा धनाग्रीकरण (Anodising) 

उत्तर :

या पद्धतीत तांबे, ॲल्युमिनिअमसारख्या धातूंवर विद्युत अपघटनाद्वारे ॲल्युमिनिअम किंवा तांब्याच्या ऑक्साइडचा पातळ, मजबूत लेप देतात. जेव्हा ॲल्युमिनिअमचे धनाग्रीकरण करतात, तेव्हा तयार झालेल्या ॲल्युमिनिअमच्या पातळ ऑक्साइड थरामुळे ॲल्युमिनिअमचा ऑक्सिजन व पाणी यांच्याशी संपर्क येतो. त्यामुळे नंतरचे ऑक्सिडीकरण रोखले जाते. हा लेप धातूचे क्षरण होण्यापासून संरक्षण करतो. धनाग्रीकरण करताना ऑक्साइडचा थर अधिक जाड करून हे संरक्षण वाढवता येते. या पद्धतीत तांबे किंवा ॲल्युमिनिअमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात. स्वयंपाकगृहात वापरले जाणारे ॲनोडाइज्ड प्रेशर कुकर, कढई तसेच सरकत्या खिडक्यांच्या फ्रेम्स हे सर्व धनाग्रीकरण तंत्राचे उपयोजन आहे. 


धनाग्रीकरण
धनाग्रीकरण


Previous Post Next Post