प्रश्न | संकल्पना स्पष्ट करा चळवळ |
उत्तर | i) एखाद्या प्रश्नाच्या निराकरणासाठी जेव्हा लोक संघटित होऊन सातत्याने कृती करतात, तेव्हा तिला 'चळवळ' असे म्हणतात. ii) चळवळी या नागरिकांचा सार्वजनिक जीवनातील सहभाग वाढवतात. सार्वजनिक हितासाठी आणि प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी चळवळी होत असतात. iii) सरकारवर दबाव आणून आपले प्रश्न सोडवण्यासाठीच चळवळी होतात असे. नाही; तर शासनाच्या काही निर्णयांना वा धोरणांना विरोध करण्यासाठीही चळवळी होतात. iv) धार्मिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, पर्यावरणविषयक, स्वच्छता, वाईट प्रथा-परंपरा इत्यादी विविध विषयांतील प्रश्न घेऊन चळवळी होत असतात. |