प्रश्न | संकल्पना स्पष्ट करा डावे उग्रवादी |
उत्तर | i) भूमिहीन शेतकरी, आदिवासी यांच्यावर जमीनदारांकडून होणारा अन्याय दूर करण्यासाठी आणि त्यांच्याकडील जमिनी बळकावण्यासाठी पश्चिम बंगाल या राज्यात नक्षलवादी चळवळ सुरू झाली. ii) या चळवळीवर मार्क्सवादाचा प्रभाव असल्याने त्यांना 'डाव्या विचारसरणीचे म्हणून संबोधले जाते. iii) सुरुवातीच्या उद्दिष्टांपासून भरकटत जाऊन ही चळवळ आता उग्रवादी बनली आहे. iv) शेतकरी-आदिवासी यांना न्याय देण्याऐवजी ही चळवळ सरकारला हिंसक पद्धतीने विरोध करीत आहे. राजकीय नेते, पोलीस, लष्कर यांच्यावर सशस्त्र हल्ले केले जात आहेत. |