संकल्पना स्पष्ट करा निवडणूक आयोग

संकल्पना स्पष्ट करा निवडणूक आयोग

 

प्रश्न 

संकल्पना स्पष्ट करा निवडणूक आयोग


 उत्तर 


i) लोकशाहीच्या यशस्वितेसाठी ठरावीक कालावधीत निवडणुकांची गरज असते. या निवडणुका खुल्या वातावरणात घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी. 

ii) या विचाराने संविधानाने कलम ३२४ अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केली. या यंत्रणेत एक मुख्य आयुक्त व अन्य दोन निवडणूक आयुक्त असून त्यांची राष्ट्रपतींकडून नेमणूक होते.

iii) या तीनही आयुक्तांचा दर्जा व अधिकार समान असतात. निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापासून निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यापर्यंत निवडणुकीची सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या नियंत्रणेखाली चालते.

iv) निवडणूक आयोगाकडे स्वतःचा स्वतंत्र कर्मचारीवर्ग नसतो. शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांच्या मदतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते. आयोगाच्या | खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केलेली असते. निवडणूक आयोगाला स्वायत्तता असते. 



Previous Post Next Post