संकल्पना स्पष्ट करा मतपेटी ते ईव्हीएम मशीनपर्यंतचा प्रवास

संकल्पना स्पष्ट करा मतपेटी ते ईव्हीएम मशीनपर्यंतचा प्रवास

 

प्रश्न 

संकल्पना स्पष्ट करा मतपेटी ते ईव्हीएम मशीनपर्यंतचा प्रवास

 उत्तर 


i) १९५१-५२ च्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून मतपेट्यांचा वापर केला जात असे. या पहिल्या निवडणुकीत मतदानासाठी स्टीलच्या वीस लाख मतपेट्या वापरल्या गेल्या होत्या. मतदार मतपत्रिकेतील उमेदवाराच्या नावासमोर शिक्का मारून त्या मतपेटीत टाकत असत.

ii) १९९८ साली पहिल्यांदा मध्य प्रदेशातील ५, राजस्थानातील ५ व दिल्लीतील ६ अशा १६ विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा (EVM) वापर केला गेला. 

iii) २००४ च्या लोकसभा निवडणुकीपासून इव्हीएमचा नियमित वापर सुरू झाला.

iv) ईव्हीएम मशीनच्या वापरामुळे देशाचे अनेक फायदे झाले. आता, ईव्हीएम मशीनमध्ये मतदारांसाठी पडताळणी पावतीचीही सुविधा निर्माण झाली आहे.

Previous Post Next Post