प्रश्न | भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते |
उत्तर | हे विधान बरोबर आहे; कारण i) भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी सर्व बंधने रद्द केल्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे. ii) संविधानाने स्वीकारलेल्या प्रौढ मताधिकाराच्या तरतुदीमुळे सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. iii) सुरुवातीस मताधिकारासाठी असणारी २१ वर्षांची अट १८ वर्ष पूर्ण अशी केल्यामुळे मताधिकार अधिक व्यापक झाला. मतदारांची एवढी संख्या जगातील कोणत्याच लोकशाही देशात नाही; म्हणून भारतीय लोकशाही ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते. |