मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानीच झालेली का आढळते

मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानीच झालेली का आढळते

मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानीच झालेली का आढळते ?

उत्तर :

i) मानवी वस्ती म्हणजे एखाद्या भूप्रदेशात मानवाने तात्पुरते अथवा कायम स्वरूपाचे वस्तिस्थान होय. निवारा ही मानवाची मूलभूत गरज आहे. 

ii) पाणी ही मानवाची मूलभूत गरज आहे. दैनंदिन वापराबरोबर शेती, उद्योग, प्राणी यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळेच पूर्वी मानवी संस्कृतीचा उदय व विकास नद्यांकाठी झाला. आजही नदी, तलाव, सरोवर, धरणांच्या परिसरात मानवी वस्ती विकसित झालेली दिसून येते. 

iii) मासेमारी करणारे मानवी समूह संगरकिनाऱ्यावर, नदीकाठी स्थायिक झाले. खाणकाम करणाऱ्यांना खाणीजवळ व कारखान्यातील कामगारांना ओेेदयोगिक क्षेत्राजवळ कायमचे वास्तव्य करणे आवश्यक असते. त्यामुळे जगात सर्वत्र स्थायी वस्त्या निर्माण झाल्या. 

iv) सुपीक जमीन व सपाट मैदानी प्रदेशात शेती, उद्योगधंदे वाहतूक यांचा चांगला विकास होतो त्यामुळे अशा ठिकाणी लोकसंख्येत वाढ होईल. लोकसंख्येत वाढ होणे म्हणजे वस्त्यांची वाढ होणे. 

वरील सर्व कारणांमुळे मानवी वस्त्यांची वाढ अशा विशिष्ट स्थानीच झालेली आढळते. 

Previous Post Next Post