टिपा लिहा औषधी वनस्पतींचे महत्त्व

टिपा लिहा औषधी वनस्पतींचे महत्त्व

 

प्रश्न 

टिपा लिहा औषधी वनस्पतींचे महत्त्व


 उत्तर 

 

i) आयुर्वेदात नैसर्गिक साधनांचा वापर करून रोगमुक्तीचे प्रयत्न केले जातात. भारताला आयुर्वेदाचा फार मोठा वारसा आहे. 

ii) यासाठी लागणाऱ्या औषधी वनस्पती पूर्वी जंगलातून गोळा केल्या जात असत.

iii) महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची लागवड आता मोठ्या प्रमाणावर केली जाते.

iv) जगभरात तुळस, अडुळसा, ज्येष्ठमध अशा काही वनस्पतींचा वापर केला जातो. 

v) अँलोपॅथीच्या औषधांत देखील वनस्पती वापरल्या जातात.

vi) रसायनांनी तयार केलेल्या औषधांपेक्षा वनस्पतींपासून मिळवलेल्या औषधांचे दुष्परिणाम कमी असतात. त्यामुळे अशी औषधे वापरणे कधीही हितावह असते.



Previous Post Next Post